आमच्याबद्दल
“खार जमिन” म्हणजे, बंधारा बांधुन समुद्रापासुन किंवा भरतीचे पाणी आत येणाऱ्या नदी पासुन संरक्षण करुन, जी लागवडीस योग्य किंवा कोणत्याही रितीने अन्य प्रकारे लाभप्रद करण्यात आली आहे अशी भरतीच्या पाण्याखालील जमिन आणि तीत, खार, खाजण, खारेपाट, गझनी या किंवा इतर कोणत्याहीरितीने वर्णन करण्यात येणाऱ्या अशा सर्व जमिनींचा समावेश होतो.
कोकण प्रदेशात पश्चिम किनारपट्टी ही एकुण सुमारे 720 कि.मी असुन मुंबईसह ठाणे, पालघर,रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे पश्चिम किनारपट्टीलगत वसलेले आहेत. सह्याद्रीमधुन उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी खुप मोठ्या प्रमाणात खाड्यांद्वारे अरबी समुद्रात जाऊन मिळते. तसेच भरतीच्या वेळी दिवसातून दोन वेळा समुद्रातील खारे पाणी खाडीच्या प्रवाहाच्या विरुध्द दिशेने खाडीत शिरकाव करते. साधारण 10 ते 15 कि.मी.लांबी पर्यंतच्या खाडीच्या पात्रातील गोडे पाणी खार होऊन लगतच्या शेत जमिनीचे नुकसान करते.
खारभूमी विकास योजनेमध्ये समुद्र किनारी किंवा खाडी किनारी उच्चतम भरतीच्या पातळीवर (HTL) मातीचा बांध घालून भरतीचे पाणी उथळ जमिनीवर पसरण्यास प्रतिबंध केला जातो. त्यामुळे शेतीचे समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण होते. बांधाचे संरेखन शक्यतो सरळ रेषेत व खाडी लगत असते.
नाला किंवा शेतामधून येणारे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरिता खाडीच्या मुखावर बंधाऱ्यास उघाडी बांधली जाते. या उघाडीस एकतर्फी झडपा बसविण्यात येतात. जेणेकरून पावसाचे पाणी समुद्रास जाउन मिळेल व समुद्राचे खारे पाणी शेत जमिनीस शिरकाव करणार नाही.
मातीचा बांध घालून खारभूमीचे संरक्षण केल्यामुळे शेतीलायक जमिनीत क्षारांच्या प्रवेशास अटकाव होतो. तसेच गोडया पाण्याचे साठे पुर्नभरीत होउन पुन:प्रापण केलेल्या खार जमिनीवर अधिक चांगली लागवड करता येते व खरीप हंगामातील पीकांसह इतर पीकांची उदा. नारळ सुपारी व काजूची लागवड सुघ्दा करता येईल.
खारभूमी विकास विभागाचा संघटन तक्ता
कायदे व शासन निर्णय
खारभूमी योजनांचा तपशील
खारभूमी योजनाची ३१ मार्च २०१९ रोजीची सद्यस्थिती
फोटो