प्रास्ताविक
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचा क्षेत्रीय विस्तार मोठा असून विभागामार्फत कोट्यावधी रुपये विकासकामावर खर्च होत असतात. प्रत्येक महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील भ्रष्टाचार, लाच लुचपत,गैरव्यवहार,अनियमितता इत्यादिबाबतच्या तक्रारींची चौकशी करणे आणि अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दि.20ऑगस्ट 1985 च्या शासन निर्णयानुसार मुंबई,पुणे,नाशिक,अमरावती,नागपूर व औरंगाबाद या सहा महसूल विभागात प्रत्येकी एक याप्रमाणे दक्षता पथके प्रथमतः दि. 28.02.1987 पर्यंत निर्माण करण्यात आली. सद्यस्थितीस सुधारित शासन निर्णयानुसार ठाणे,पुणे,नाशिक,अमरावती,नागपूर व औरंगाबाद या पांच महसूल विभागांकरिता दक्षता पथके कार्यरत आहेत.
वरील कार्यभाराव्यतिरिक्त,सिंचन विषयक विशेष चौकशी समितीच्या प्रस्तावित सुधारणांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने दि. 25.07.2016 च्या शासन निर्णयानुसार शासनाच्या थेट नियंत्रणाखाली अस्तित्वात असलेल्या पांच दक्षता पथकांकडे सध्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रादेशिक कार्यालये, मंडळ व विभागीय कार्यालयांचे तांत्रिक परिक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दक्षता पथक,पुणे परिमंडळाचे कार्यालय अधीक्षक अभियंता यांचे अधिपत्याखाली जानेवारी 1986 पासून सिंचन भवन,पुणे येथे कार्यरत आहे.
आमच्याविषयी
महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाचा क्षेत्रिय विस्तार मोठा असून विभागातर्फे दरवर्षी कोटयावधी रुपये विकास कामावर खर्च होत असतात. विकासाची कामे, प्रशिक्षण व नियंत्रण बाबी व कार्यालयीन कामकाज इत्यादी सांभाळून भ्रष्टाचार व गैरप्रकाराबाबतच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पुरेसा वेळ विभाग प्रमुखांना मिळू शकत नाही.त्यामुळे अशा प्रकरणांचे त्वरीत अन्वेषण होण्यास अडचण निर्माण होते. ती अडचण दूर करण्यासाठी प्रत्येक लाचलुचचपत गैरव्यवहार इत्यादी बाबत तक्रारींची चौकशी करणे व अशा गैरप्रकारांना आळा घालणेसाठी प्रत्येक महसूल विभागात एक याप्रमाणे दक्षता पथके निर्माण केली आहेत.सदर पथके शासनाच्या थेट नियंत्रणाखाली कार्यरत आहेत.
दक्षता पथक,पुणे हे पुणे विभागातील पाटबंधारे खात्याच्या भ्रष्टाचाराच्या,गैरप्रकाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी दिनांक 16/1/1986 पासून कार्यान्वित झाले आहे.या दक्षता पथकाचे अधिपत्याखाली पुणे, सातारा, सांगली,कोल्हापूर,सोलापूर,अहमदनगर व सिंधुदूर्ग जिल्हयातील जलसंपदा विभागाचे कार्यक्षेत्र येते. . दक्षता पथकाचे प्रमुख अधीक्षक अभियंता हे आहेत.या दक्षता पथकाकडे प्रामुख्याने खालील प्रमाणे कामे आहेत.
१. पुणे महसूल विभागातील सर्व जिल्ह्यांमधील तसेच अहमदनगर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील कार्यालया संदर्भातील कामाबाबत प्राप्त तक्रारीच्या संदर्भात (मुख्यत: वर्ग 1 व वर्ग 2 अधिका-यांच्या बाबत) प्रारंभिक चौकशी अहवाल तयार करुन शासनास सादर करणे. तसेच शासन निर्णय क्र.दक्षता-1079 / 1426/द-1/ दि.20/08/1985 नुसार सोपविलेली कामे पार पाडणे.
संघटन तक्ता
कामकाजाचे स्वरुप
दक्षता पथक,पुणे यांचे कार्यक्षेत्रातील जलसंपदा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या कार्यालयां संदर्भात भ्रष्टाचार,निविदा प्रक्रियेतील अनियमितता इ.प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने प्राथमिक अन्वेषण अहवाल तयार करणे आणि शासनास सादर केलेल्या प्राथमिक अन्वेषण अहवालासंदर्भात शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशांनुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही करणे.
सर्वसाधारण कार्यपध्दती
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय/परिपत्रके /आदेश विचारात घेऊन अन्वेषणाबाबतची कार्यवाही केली जाते. प्राप्त तक्रारीच्या संदर्भात प्रथम तक्रारदारानेच तक्रार केली आहे किंवा कसे याबाबत खातरजमा केली जाते व त्याचबरोबर तक्रारीच्या समर्थनार्थ काही सहाय्यक माहिती / माहिती असल्यास सादर करण्याबाबत तक्रारदारास कळविले जाते. तसेच तक्रार अर्जातील मुद्यांच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून माहिती मागविली जाते. आवश्यकतेनुसार कामास क्षेत्रीय भेट दिली जाते. प्राथमिक चौकशी पूर्ण करून प्राथमिक अन्वेषण अहवाल शासनास सादर केला जातो. सादर केलेल्या प्राथमिक अन्वेषण अहवाला संदर्भात शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार प्रारुप दोषारोपपत्रे शासनास सादर केली जातात. त्यानंतर शिस्तभंगविषयक पुढील कार्यवाही शासन स्तरावर केली जाते.
तांत्रिक परिक्षण
दक्षता पथक,पुणे कार्यक्षेत्रातील प्रादेशिक कार्यालये, मंडळ कार्यालये व विभागीय कार्यालयांचे तांत्रिक परिक्षण करणे व तदनंतर तांत्रिक परिक्षण अहवालामधील आक्षेपासंदर्भात प्रचलित शासन निर्देशांनुसार पुढील कार्यवाही करणे.
तांत्रिक परीक्षणासंदर्भात खालील नमूद शासन निर्णय /परिपत्रकांनुसार कार्यवाही केली जाते.