प्रस्तावना
मुख्य अभियंता (स्था.) जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण पुणे या प्रदेश कार्यालयांतर्गत प्रकल्पावरील कामाचे गुणनियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्रात खालीलप्रमाणे पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे एकूण ३ गुणनियंत्रण मंडळे कार्यरत आहेत.
संघटन तक्ता
गुण नियंत्रण मंडळ पुणे
महाराष्ट्रातील पाटबंधारे प्रकल्पासाठी जागतीक बॅकेचे अर्थ सहाय्य प्राप्त झाल्यानंतर गुणनियंत्रण मंडळ, पुणे या कार्यालयाची स्थापना सन १९८० मध्ये झाली. गुणनियंत्रण मंडळ पुणे हे ISO ९००१-२०१५ मान्यताप्राप्त कार्यालय आहे. महाराष्ट कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे या दोन्ही महामंडळांतर्गतच्या प्रकल्पांचे गुण नियंत्रण या मंडळामार्फत केले जाते. या मंडळामार्फत पुणे, नगर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद ,सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , रायगड, ठाणे, पालघर या बारा जिल्हातील प्रकल्पांचे गुणनियंत्रण करण्यात येते. सदरील प्रकल्पांची गुणनियंत्रणाची कामे पार पाडण्याकरिता ४ विभाग व १४ उपविभाग कार्यरत असुन त्या अंतर्गत एकूण १४ प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत.
गुणनियंत्रण मंडळ औरंगाबाद
गुणनियंत्रण मंडळ, औरंगाबाद या कार्यालयाची स्थापना दिनांक १/६/१९९९ रोजी झाली आहे. या मंडळातर्गत गुण नियंत्रण विभाग , नांदेड व गुणनियंत्रण विभाग हे दोन विभाग व ८ उपविभाग कार्यरत आहेत. गुणनियंत्रण विभाग, नांदेड यांचे मार्फत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद अंतर्गत येणारे मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील रंगाबाद,जालना,बीड,लातूर,उस्मानाबाद,नांदेड,परभणी,हिंगोली बांधकामाधीन प्रकल्पांचे गुणनियंत्रण केले जाते. तसेच गुणनियंत्रण विभाग धुळे यांचे मार्फत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद अंतर्गत येणारे उत्तर महाराष्ट्रातील २ जिल्हे अहमदनगर व नाशिक व तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत येणारे ३ जिल्हे धुळे,जळगाव व नंदुरबार या ५ जिल्ह्यांतील बांधकामाधीन प्रकल्पांचे गुणनियंत्रण केले जाते. या मंडळामार्फत औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, जळगांव, नंदूरबार, अहमदनगर व नाशिक या १३ जिल्ह्यातील प्रकल्पांचे गुणनियंत्रण करण्याकरीता २ विभाग व ८ उपविभाग कार्यरत असून त्या अंतर्गत १० प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत.
गुणनियंत्रण मंडळ नागपूर
विदर्भ प्रादेशिक क्षेत्राकरिता एक स्वतंत्र गुणनियंत्रण मंडळ असावे या उद्येशाने व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील प्रकल्पांसाठी गुणनियंत्रण मंडळ, नागपुर हे कार्यालय विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील व जलसंपदा विभागाकडील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र.आढावा २००९ (१२६/२००९)/ निवंस/3-/आ/(प्र.शि.) दि.२४ जुलै २००९अन्वये दि.१/८/२००९ पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत शासन निर्णय क्र.मेरीबै.०११५/प्र.क्र.०१/२०१५/जसं (धोरण) मंत्रालय, मुंबई दि.१४ जानेवारी २०१५ अन्वये गुणनियंत्रण मंडळ नागपूर हे कार्यालय दि.१/४/२०१५ पासून मा.मुख्य अभियंता (स्था.) जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण पुणे यांचे अखत्यारीत नागपूर येथे कार्यरत आहे.
गुणनियंत्रण मंडळ, नागपूर या मंडळांतर्गत सध्या नागपूर, अमरावती, वाही, खामगाव व अकोला अशी एकूण पाच विभागीय कार्यालये व १८ उपविभागीय कार्यालये कार्यरत आहेत.
या मंडळामार्फत नागपूर महसूल प्रदेश अंतर्गतच्या नागपूर, गोंदिया,भंडारा, वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर असे ६ जिल्हे व अमरावती महसूल प्रदेश अंतर्गतच्या अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ असे ५ जिल्हे असे मिळून एकंदर ११ जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील व जलसंपदा विभागाकडील प्रकल्पांचे गुणनियंत्रण या मंडळांतर्गतच्या वर नमूद ५ विभाग, १८ उपविभाग व १४ प्रयोगशाळा यांच्या माध्यमातून करण्यात येते.
गुणनियंत्रण कामाचे स्वरूप
वरील सर्व गुणनियंत्रण मंडळ हे प्रामुख्याने :
२ - तांत्रिक परिक्षणाद्वारे, विनिर्दिष्टाप्रमाणे काम होण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर निरीक्षण टिपण्याद्वारे/ चाचण्यांद्वारे ( Inspection Notes/Field & Labratory Tests) कामातील त्रुटी निदर्शनास आणून देणे तसेच आवश्यक सुधारणा सुचविणे अशा दोन टप्प्यात काम करते.
प्रकल्पावरील कामाची गुणवत्ता योग्य राखणे व प्रकल्पाचे काम विनिर्दिष्टतेप्रमाणे होत आहे या बाबत दक्षता घेणे ही जबाबदारी प्रामुख्याने बांधकाम यंत्रणेची असून, गुणनियंत्रण यंत्रणा ही त्रैयस्थ निरिक्षक म्हणून काम करते. बांधकाम सामग्रीच्या चाचण्या घेणेसाठी सामग्री चाचणी व माती चाचणींच्या प्रयोगशाळा या मंडळांचे अंतर्गत आहेत. या प्रयोगशाळांमधून बांधकाम कक्षाने बांधकाम साहित्याच्या चाचण्या घेऊन साहित्याची गुणवत्ता तपासून घेणे आवश्यक आहे.
गुणनियंत्रणाचे काम प्रामुख्याने दि.११/०९/२०१९ रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या गुणनियंत्रण विषयक परिपत्रके व सार्वजनिक बांधकाम निर्देशक पुस्तीका खंड 33 भाग १ व २ व भारतीय मानके यानुसार केले जाते.
गुणनियंत्रण व साहित्य चाचणी प्रणाली
दिनांक २९/०८/२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये जलसंपदा विभागांतर्गत गुणनियंत्रण व साहित्य चाचणी साठी Online Quality Control and Material Testing हि नवीन संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी समिती गठन करण्यात आली होती. समितीचे मार्गदर्शना खाली बांधकाम व्यवस्थापन संगणकीकरण विभाग, कोथरूड, पुणे यांनी Online Quality Control and Material Testing हि नवीन संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. दिनांक २८/०८/२०१९ चे शासन परिपत्रकानूसार Online Quality Control and Material Testing हि नवीन संगणकीय प्रणालीचा दिनांक ०१ ऑक्टोबर २०१९ पासून बांधकाम व गुणनियंत्रण कक्षाने वापर करणे बंधनकारक केले आहे. प्रणाली मध्ये खालीलप्रमाणे चार वेगवेगळी मोड्युल आहेत.
1) वार्षिक बांधकाम कार्यक्रम
2) ओके कार्ड
3) कामाची तपासणी (तपासणी योजना, तपासणी टीपा, तपासणी स्लिप)
4) बांधकाम साहित्य चाचणी
प्रणाली मधील मोड्युलचा बांधकाम व गुणनियंत्रण कक्षाने वापर करणे अनिवार्य आहे.
गुणनियंत्रण मंडळ अंतर्गत प्रयोगशाळेमध्ये सर्वसाधारणपणे घेण्यात येणाऱ्या चाचण्या
मंडळांतर्गत असलेल्या मृत्तिका चाचणी व सामुग्री चाचणी द्वारे खालील प्रकारच्या सर्वसाधारण चाचण्या घेतल्या जातात.