यांत्रिकी संघटना

 

यांत्रिकी संघटना ही महाराष्ट्र  शासनाच्या जलसंपदा विभागाची शाखा आहे. तिची स्थापना खालील कामांकरिता सन १९५९ साली झाली.

 • माती खोदकामाच्या यंत्रसामुग्रीचे व्यवस्थापन.
 • विमोचकाचे दरवाजे व उच्चालक यांचे व्यवस्थापन.
 • उपसा जलसिंचन योजनेच्या  उदंचन यंत्रांचे व्यवस्थापन.
 • यांत्रिकी कर्मशाळांचे व्यवस्थापन.
 • भांडार व्यवस्थापन.
 • तातडीच्या सेवा.

 

    गत ५२ वर्षांमध्ये राज्याच्या सिंचन,पाणी पुरवठा आणि जलविद्युत प्रकल्पांच्या विकासामध्ये यांत्रिकी संघटनेचे मौल्यवान योगदान आहे. यांत्रिकी संघटनेचा विस्तार खालील प्रमाणे

 

 • मुख्य अभियंता कार्यालय ()
 • मंडळ कार्यालये ()
 • विभागीय कार्यालये (३०)
 • उप विभागीय कार्यालये (१२६)

एकूण कर्मचारी आणि संयंत्रे खालीलप्रमाणे :-

 

कर्मचारी

संयंत्रे

·         अभियंते - १०३७

·         क्षेत्रिय कर्मचारी - ४५११

·         प्रशासकीय कर्मचारी -३१६७

यंत्रांचे भांडवली मूल्य : रूपये १४७ कोटी (अंदाजे)

 

 

        सन १९५९ पासून यांत्रिकी संघटनेद्वारे झालेली कामे :

 • एकूण प्रकल्पांचे मातीकाम आणि कालव्याची स्वच्छता - ,६५,५८२ हजार घनमीटर.
 • लोखंडी दरवाज्यांची कामे  :

दरवाज्यांची निर्मिती कामे  - ,५१,७०० मे.टन.

दरवाज्यांची उभारणीची कामे - ,३१,७००मे.टन.

 • कूपनलिका व विंधन विवरांचे काम-,७७,९१७ मीटर.
 • भूविकास कामे - १५०० हेक्टर्स
 • जून २०१० पासून कालव्यातील गाळ काढणे तथा कालवा स्वच्छतेची कामे -६४,५३० हजार घन मीटर.
 • महाराष्ट्र शासनाच्या यांत्रिकी संघटनेचे संकेतस्थळ


http://www.mahayantriki.gov.in