Hydro Power

जल ऊर्जा

महाराष्ट्रामध्ये जलविद्युत प्रकल्पांची बांधकामे जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात आलेली आहेत. जलविद्युत प्रकल्पांच्या कामांची अंमलबजावणी ही जलसंपदा विभागाच्या स्थापत्य, यांत्रिक आणि विद्युत विभागाच्या उत्तम समन्वयाने केली जातात. काही मोठे स्वतंत्र जलविद्युत प्रकल्प वगळता राज्यातील मोठ्या जलविद्युत प्रकल्पांची बांधकामे ही धरण पायथ्याच्या जवळ असलेल्या विद्युत गृहांची आहेत. या जलविद्युत प्रकल्पांमधून निर्माण होणरी वीज ही महाराष्ट्र महानिर्मीती कंपनीच्या मुख्य वीज वाहिनीस जोडण्यात येते. यशस्वी कार्यान्विती करणानंतर जलविद्युत प्रकल्प महानिर्मीती कंपनीस चालविण्याच्या आणि देखभालीच्या हेतूने हस्तांतरीत करण्यात येतात.

न्युनत आणि स्वच्छ उर्जास्त्रोत म्हणून महाराष्ट्र सरकारने महत्तम प्रयत्न करुन राज्यातील उपलब्ध जलस्त्रोत पूर्णत्वाने विकसीत करण्यावर भर दिला आहे आणि त्याकरिता लघु जलविद्युत प्रकल्पांच्या विकासासाठी खाजगी क्षेत्रास प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने धोरण जाहिर केले आहे आणि हे धोरण मध्यमवर्ती उर्जा प्रकल्प (CPP) म्हणून २५ मे.वॉ. कार्यक्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पांना लागू आहे. सदर प्रकल्प हे अपारंपारिक उर्जास्त्रोत म्हणून गणले जातात.

जलउर्जा बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न. (FAQs)