लाक्षेवि व जलव्यवस्थापन

स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये देशातील शेती उत्पादनांमध्ये वाढ करण्यासाठी मोठ्या संख्येने सिंचन प्रकल्प बांधण्यात आले. तथापि अलीकडील ७० वर्षाचा काळ लक्षात घेता ओलीताखालील क्षेत्र वृध्दी आणि पाणीवापर यामध्ये खूप तफावत दिसते. १९७२ साली सिंचन आणि उर्जा मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी या विषयावर साकल्याने विचार करुन प्रत्येक मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील व्यापक विकासासाठी क्षेत्र विकास प्राधिकरण (Area Development Authority) स्थापन करण्यात यावे असे सुचविले. या शिफारशीवर आधारित डिसेंबर १९७४ मध्ये भारत सरकारने मध्यवर्ती प्रायोजित " लाभक्षेत्र विकास कार्यक्रम" सुरु केला की ज्यायोगे सिंचन क्षमता वापरामध्ये सुधारणा होवून, कार्यक्षम जल व्यवस्थापनाद्वारे सिंचीत शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन निघू शकेल.


कृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.