विश्वेश्वरय्या कालवा स्वच्छता अभियान

कालवा, वितरिका इ. सिंचन प्रणालीची कामे निविदाऐवजी शासकीय यंत्र समुग्रीने रोजगार हमी योजनेमार्फत, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना तसेच श्रमदानाच्या माध्यमातून राबविणेबाबत.

जलसंपदा विभागाने दि.02 ऑक्टोंबर, 2002 पासून जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या पूर्ण सहयोगाने विश्वेश्वरय्या कालवा स्वच्छता अभियान राबवून एक नविन पर्व सुरु केले.

जलसंपदा विभागाकडील यांत्रिकी संघटनेकडे असलेल्या यंत्र सामुग्रीचा कार्यक्षमतेने वापर करुन तसेच स्थानिक शाळा व महाविदयालये यातील विद्यार्थी, लाभधारक शेतकरी यांना श्रमदानाचे आव्हान करुन सहकारी साखर कारखान्याचे सहकार्याने कालवा स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येते.

या अभियानाखाली कालवे, वितरिका इत्यादी सिंचन प्रणालीची वार्षिक नियमित देखभाल दुरुस्ती, गाळ काढणे, गवत झाडे झुडपे काढणे व मातीकाम या स्वरुपाची कामे पुढे दर्शविल्याप्रमाणे करण्यात येतात.

1) जलसंपदा विभागातील यांत्रिकी संघटनेकडील यंत्र सामुग्रीचा वापर करुन
2) महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत
3) रुपांतरीत नियमित अस्थायी आस्थापनेवरील मजूर व कार्यव्ययी आस्थापनेवरील मजूर वापरून
4) स्थानिक ग्रामस्थ व लाभार्थी यांच्या श्रमदानाने
5) प्रकल्पक्षेत्र समादेश क्षेत्रातील संबंधित सहकारी साखर कारखान्यांकडील यंत्रसामुग्री इत्यादींचे सहकार्य घेऊन

या अभियानामुळे पाटबंधारे प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाच्या खर्चात मोठया प्रमाणावर बचत होते.