एकात्मिक राज्य जल आराखडा


प्रस्तावना:

महाराष्ट्र राज्य जलनीतीचे उद्दिष्ट असे आहे कि खोरे/उपखोरे निहाय एका स्थायी आधारावर जलसंपदा नियोजन, विकास व व्यवस्थापन देणारा एकात्मिक आणि बहु क्षेत्रीय दृष्टीकोण बाळगणे. राज्यातील जलस्त्रोतांचे भूपृष्ठावरील पाणी व भूजल यांचा एकत्र विचार करून खोरे/उपखोरे निहाय बहु क्षेत्रीय दृष्टीकोण बाळगून पाण्याचे नियोजन, विकास व व्यवस्थापन करण्यात येईल. राज्य जलनीतीच्या रणनिती मध्ये असा उल्लेख केला आहे कि राज्याने राज्य जल आराखडा तयार करून त्याद्वारे रचनात्मक, कार्यरत, पाणलोट व्यवस्थापन, मागणी व्यवस्थापन, जल प्रदूषण नियंत्रण व देखरेख उपाय समावेश असलेला विविध पाणी वापर लोकांमध्ये संतुलित विकास व योग्य समन्वय साधून त्याद्वारे राज्य आणि राज्यातील लोकांना पाण्याच्या स्त्रोतांचा शाश्वत व्यवस्थापन व पाण्याच्या समन्यायी वाटपाचे आश्वासन देईल..

एकात्मिक राज्य जलआराखडयाची उद्दिष्टे

• उपखोऱ्यातील भूपृष्ठावरील व भुगर्भातील पाणी वापराचा दीर्घकालीन एकात्मिक आराखडा तयार करणे.

• जलसंपत्ती विकसनाचे प्रकल्प निश्चित करणे व त्याचा प्राधान्यक्रम ठरविणे.

• राज्य शासनाने ठरविलेला प्राधान्यक्रम व आर्थिक तरतुद विचारात घेऊन अल्पकालीन कृती आराखडा तयार करणे.

• जलसंधारणास प्रोत्साहन देणे तसेच पाण्याच्या गुणवत्तेचे संरक्षण व त्यामध्ये निरंतर सुधारणा करणे.

आवश्यक माहिती

१) भौगोलिक स्थिती व लोकसंख्या

२) भू-रचना

३) माती

४) भूगर्भशास्त्र

५) जल भूगर्भशास्त्र

६) कृषी

७) जलविज्ञान व जलहवामान

८) सिंचन (अनुशेषासह)

९) जलसंधारण

१०) पेय जल (शहरी व ग्रामीण)

११) औद्योगिक वापर

१२) बाहेरील नदी खोऱ्यांशी पाण्याची देव-घेव

१३) पर्यावरण (पाणी गुणवत्ता, स्वच्छता)

१४) जल विद्युत

१५) भूगर्भातील पाणी

१६) नेसर्गिक आपत्ती (पूर, भूकंप, दुष्काळ)

१७) कायदेविषयक (आंतरराज्यीय करार, लवाद)

एकात्मिक राज्य जल आराखडयातील प्रकरणे

१) परिचय

२) नद्यांची रचना

३) माती व भूगर्भशास्त्र

४) जलहवामानशास्त्र

५) कृषी

६) भूपृष्ठीय जल स्त्रोत

७) भूजल स्त्रोत

८) सिंचन

९) जल संधारण

१०) पूर

११) जलनि:सारण

१२) पेय जल (शहरी व ग्रामीण)

१३) औद्योगिक

१४) न्यायीक बाबी (लवादाचे निर्णय, आंतरराज्यीय करार)

१५) बाहेरील नदी खोऱ्यांशी पाण्याची देव-घेव

१६) इतर विशेष आवश्यकता

१७) पर्यावरण व्यवस्थापन व पर्यावरणशास्त्र

१८) संस्थात्मक व्यवस्था

१९) आधुनिक उपकरणांचा वापर

२०) जलसमतोल

२१) आर्थिक पैलू

२२) भागदारक सल्ला

२३) कृती आराखडा

२४) राज्य जल परिषद मान्यता