धोरणे

जलस्त्रोत धोरण, संस्थांची निर्मीती आणि धोरणे तयार करण्याची पध्दत यांचा ठसा पाण्याचे संचयन, वापर आणि त्याचे पर्यावारणपूरक नि:सारण व मानवी वापर या बाबींवर उमटतो. धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी ही जलसंपत्ती व्यवस्थापन, जलप्रदुषण, जलशुध्दीकरण, जलविज्ञान, सिंचन, मत्स्यउद्योग व्यवस्थापन या आणि इतर खुप गोष्टींशी संबंधीत असते. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी “राष्ट्रीय जलनिती” आणि “राज्य जलनिती” तयार केली असून, पाणी नियोजन आणि जलस्त्रोतांचा विकास आणि त्यांचा महत्तम वापर इत्यादी करिता सदर नीती नियामक म्हणून काम करतात.